हाय बीपीच्या रुग्णांनी हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत?
Krantee V. Kale
हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणून अनेकदा ब्लड प्रेशर वाढतो.
| All photos- yandex
हिवाळ्यात हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बीपी आणखी वाढू शकतो.
हाय बीपीच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नये, जाणून घ्या.
लोणचे, पापड, खारट स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. कारण यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. जास्त मीठ शरीरात पाणी टिकवून ठेवते, ज्यामुळे बीपी वाढतो.
समोसे, भजी आणि पॅटीस यांसारखे पदार्थ टाळा. तळलेल्या पदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्याचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या कडक होऊन रक्तदाब वाढू शकतो.
चिप्स, फ्रेंच फ्राईज, इन्स्टंट नूडल्स आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्समध्ये सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात. ज्यामुळे बीपी लगेच वाढतो.
साखरमुळे वजन वाढते आणि बीपीवर परिणाम होतो. म्हणून, गुलाब जामुन, हलवा, केक आणि गोड पेये टाळा. शक्य झाल्यास या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा.
हाय बीपीच्या रुग्णांनी चहा , कॉफी सारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.