हिवाळ्यात कानदुखीचा त्रास वाढतोय? 'या' चुका टाळा मिळेल लगेच आराम
किशोरी घायवट-उबाळे
कान झाका, थंडीपासून संरक्षण करा : थंड वाऱ्यामुळे कान दुखतात. बाहेर जाताना मफलर, टोपी किंवा इअरमफ्स वापरा. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
कान कोरडे ठेवा : आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर कानात ओलावा राहू देऊ नका. ओलावा असल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
कोमट तेलाचे १-२ थेंब : नारळ तेल किंवा तिळाचे कोमट तेल कानात टाकल्यास कोरडेपणा आणि दुखणे कमी होते.
थंड हवेत थेट वारा टाळा :बाईकवर किंवा प्रवासात कानावर थेट हवा लागू देऊ नका. बाहेर जाताना हेल्मेट किंवा स्कार्फ वापरणे फायदेशीर ठरते.
कानात काडी किंवा धारदार वस्तू घालू नका : खाज येत असल्यास काडी वापरू नका, यामुळे जखम होऊ शकते आणि वेदना वाढतात.
गरम पाण्याची वाफ घ्या : वाफ घेतल्याने कानातील ताण कमी होतो आणि थंडीमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या : दुखणे, सूज किंवा ऐकू कमी येत असल्यास त्वरित ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)