हिवाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' ७ उपाय ठरतील फायदेशीर

Krantee V. Kale

हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव होतात यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. म्हणून हिवाळ्यात केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. | All Photos- Yandex
जर तुम्हीही या समस्येने त्रस्त आहात तर या सोप्या टिप्स वापरु शकता.
आवळा, बदाम किंवा नारळाचे तेल हलके गरम करुन स्कॅल्पला लावा आणि मसाज करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल लावून मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळेल.
हिवाळ्यात थंड हवेमुळे स्कॅल्प कोरडा होतो. यासाठी पुरेसे पाणी प्या जेणेकरुन स्कॅल्प हायड्रेटेड राहील.
दररोज शॅम्पूने केस धुतल्याने केसांतील नैसर्गिक तेल निघून जाते. म्हणून हिवाळ्यात सौम्य शॅम्पूचा वापर करा आणि आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवा.
जास्त गरम पाण्याने केस धुवू नका. यामुळे स्कॅल्प ड्राय होतो आणि कोंडा किंवा केस गळण्याची समस्या वाढते. म्हणून कोमट पाण्याने केस धुवा.
शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडीशनर वापरा. कंडीशनरमुळे केसातील कोरडेपणा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात.
ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग आयर्नसारख्या साधनांचा वापर कमी करा. यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.
निरोगी केसांसाठी आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन ई, आयरन आणि ओमेगा-३ युक्त पदार्थ जसे की, नट्स, डाळी, मासे आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)