Winter Health: हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून कसा आराम मिळवायचा?
Krantee V. Kale
हिवाळ्यात सर्दी- खोकला सारखे आजार होणे सामान्य आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. | All Photos-Yandex
हिवाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा.
हिवाळ्यात कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि घश्याची सूज कमी होण्यास मदत होते.
संत्री, आवळा आणि लिंबू सारख्या व्हिटॅमिन सीयुक्त फळांचे सेवन करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी वाफ घ्या. वाफ घेतल्यानंतर नाक आणि घशात चिकटलेले धूळीचे कण निघून जातात.
बाहेरुन आल्यानंतर नियमितपणे हात स्वच्छ धुवा. नियमित हात धुतल्याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
थंड वातावरणामुळे सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणून शक्य तेवढे ऊबदार कपडे घाला.