हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं, आरोग्यावर होईल परिणाम

Krantee V. Kale

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डॉक्टर देखील फळं खाण्याचा सल्ला देतात. | All Photos- Yandex
परंतु, हिवाळ्यात काही फळं खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात, ही फळं कोणती, जाणून घ्या.
हिवाळ्यात द्राक्षे कमी प्रमाणात खा. जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर द्राक्ष खाणं टाळा.
हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाणं देखील टाळावे. स्ट्रॉबेरी शरीरासाठी थंड असते त्यामुळे खोकला, सर्दी आणि अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.
काकडी आणि टरबूज हिवाळ्यात खाऊ नये. थंड वातावरणात, ही फळं शरीराला आतून आणखी थंडावा देतात, ज्यामुळे तुम्ही आजाराला बळी पडू शकता.
नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी हिवाळ्यात याचे सेवन करणे टाळा. अन्यथा खोकला आणि कफचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात संत्री खाणं टाळा. संत्री आबंट असते, यामुळे घसा खवखवणे किंवा सर्दी यासारखे त्रास होऊ शकतात.
अवोकाडो हे फळ पोषक तत्वाने समृद्ध आहे. परंतु हिवाळ्यात हे फळ खाल्ल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होण्याचा धोका वाढतो.