Winter Health Tips : हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी पिणं टाळता? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी करा 'हे' बदल
किशोरी घायवट-उबाळे
कोमट पाणी प्या - थंड पाण्याऐवजी दिवसभर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पाणी पिणे सोपे जाईल.
जवळ पाण्याची बाटली ठेवा - ऑफिसमध्ये किंवा घरात काम करताना जवळ पाण्याची बाटली ठेवा. त्यामुळे अधूनमधून पाणी पिण्याची आठवण राहील.
पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळं खा - संत्री, मोसंबी, पेरू आणि इतर रसाळ फळांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला पाण्यासोबत पोषक घटकही मिळतात.
आहारात सूपचा समावेश करा - हिवाळ्यात गरमागरम भाज्यांचे सूप पिणे हा शरीराला द्रवपदार्थ मिळवण्याचा चांगला पर्याय आहे.
हर्बल टी प्या - आल्याचा किंवा तुळशीचा चहा यांसारखी कॅफीनमुक्त पेये आहारात घेऊ शकता. मात्र, पाण्याला त्यांची जागा देऊ नका.
दिवसाची सुरुवात पाण्याने करा - सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे दिवसभर पाणी पिण्याची चांगली सुरुवात होईल.
आहारात सॅलड खा - काकडी, टोमॅटो आणि कोशिंबिरीसारखे पाण्याचे प्रमाण असलेले पदार्थ जेवणात घ्या. यामुळे शरीराला द्रवपदार्थ मिळण्यास मदत होते.
तहान लागण्याची वाट पाहू नका - हिवाळ्यात तहान कमी लागली तरी नियमित अंतराने पाणी प्या. लघवीचा रंग फिकट पिवळा राहतोय का, याकडेही लक्ष द्या
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)