हिवाळ्यात सॉफ्ट आणि सिल्की केसांसाठी वापरा 'हे' घरगुती हेअर मास्क
किशोरी घायवट-उबाळे
नारळ तेल + मध हेअर मास्क : हिवाळ्यात केस कोरडे आणि निस्तेज होतात. नारळ तेल आणि मध मिसळून लावल्यास केसांना खोलवर पोषण मिळते आणि नैसर्गिक चमक येते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
दही + अंडं हेअर मास्क : दही केसांना मऊ करते तर अंड्यामुळे प्रोटीन मिळते. आठवड्यातून एकदा हा मास्क लावल्यास केस गळती कमी होते.
अॅलोवेरा जेल हेअर मास्क : अॅलोवेरा स्कॅल्प कोरडेपणा कमी करतो आणि कोंडा दूर ठेवतो. थंड हवामानात हा मास्क खूप फायदेशीर ठरतो.
केळी + मध + दूध मास्क : फाटे फुटलेल्या कोरड्या केसांसाठी हा मास्क उत्तम आहे. केसांना सॉफ्ट आणि सिल्की लुक मिळतो.
बदाम तेल + ऑलिव्ह ऑइल मास्क : हिवाळ्यात केस तुटत असतील तर हा मास्क उपयोगी आहे. केस मजबूत होतात आणि चमक वाढते.
मेथी दाणे + दही मास्क : कोंडा, खाज आणि स्कॅल्प ड्रायनेससाठी हा घरगुती उपाय रामबाण आहे. केस गळती कमी होण्यास मदत होते.
आठवड्यातून किती वेळा मास्क लावावा? : हिवाळ्यात आठवड्यातून १ ते २ वेळा हेअर मास्क लावणे पुरेसे आहे. जास्त वापर टाळावा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)