थंडीत ओठ फाटतात? मग गुलाबी अन् सॉफ्ट ओठांसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Krantee V. Kale

हिवाळ्यात ओठ फाटणे ही समस्या सामान्य आहे. अनेकदा फाटलेल्या ओठांतून रक्त देखील येते. | All photos- yandex
आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुमचे ओठ देखील मऊ आणि गुलाबी होतील.
भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते आणि डिहायड्रेशनमुळे ओठ कोरडे होऊन फाटू शकतात.
मऊ आणि गुलाबी ओठांसाठी लिंबू आणि मध एकत्र मिसळून ओठांवर लावा. यामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेवोनोइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व असतात. जे ओठांवरील काळसरपणा दूर करण्यास मदत करतात.
दररोजच्या आहारात डाळिंब, टोमॅटो, गाजर आणि पालक सारख्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे ओठ हायड्रेट आणि मऊ राहण्यास मदत होते.
गुलाबाच्या पाकळ्या बारीक वाटून घ्या. यामध्ये मध आणि नारळाचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ५ ते १० मिनिटांसाठी ओठांवर लावून थंड पाण्याने धुवा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
कच्चे दूध, व्हिटॅमिन ई कॅप्सुल, कोरफडीचे जेल आणि गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा ओठांवर लावा आणि थंड पाण्याने धुवा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.