हिवाळ्यात सकाळीच 'या' पेयांचे सेवन करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
किशोरी घायवट-उबाळे
कोमट पाणी- सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनक्रिया सुधारते. | (सर्व छायाचित्र - Yandex)
तुळस-आलं काढा- तुळस आणि आलं उकळून तयार केलेला काढा सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देतो.
हळदीचं दूध- हळद मिसळलेलं गरम दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
जिऱ्याचं पाणी- जिरं उकळून केलेलं पाणी पचनासाठी फायदेशीर असून पोटफुगी कमी होण्यास मदत होते.
लिंबू-मध घातलेले कोमट पाणी- यामुळे व्हिटॅमिन C मिळतं आणि शरीराला ताजेपणा येतो.
सुकामेव्याचं दूध- बदाम, अक्रोड घातलेलं गरम दूध ऊर्जा देणारे ठरते.
ग्रीन टी किंवा हर्बल टी- अँटिऑक्सिडंट्समुळे शरीर तंदुरुस्त राहते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)