Winter Night Skin Care : हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी घ्या त्वचेची काळजी; सकाळी चेहरा दिसेल चमकदार
किशोरी घायवट-उबाळे
चेहरा स्वच्छ करा - दिवसभरातील धूळ, प्रदूषण आणि मेकअप काढण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा.
हायड्रेटिंग टोनर वापरा - त्वचेला ओलावा देणारा अल्कोहोलमुक्त टोनर वापरा.
सिरम लावा - हायलुरोनिक ॲसिड असलेले सिरम त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करू शकते.
मॉइश्चरायझर लावा - त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी योग्य मॉइश्चरायझर वापरा.
ओठांची काळजी घ्या - ओठांचा कोरडेपणा आणि भेगा टाळण्यासाठी लिप बाम लावा.
डोळ्यांखाली क्रीम लावा - डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा.
हात-पायांना मॉइश्चरायझ करा - हात-पायांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा.
पुरेशी झोप घ्या - त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि योग्य दिनचर्याही महत्त्वाची आहे.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)