Winter Superfood : हिवाळ्यात आवर्जून खा रताळे; डोळे, हृदय अन् पचनासाठी ठरतात फायदेशीर
किशोरी घायवट-उबाळे
हिवाळ्यात बाजारात सहज उपलब्ध होणारे रताळे केवळ चवीला गोड नसून पोषक घटकांनीही समृद्ध असतात.
रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. शरीर त्याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते, जे डोळ्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे.
रताळ्यांमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण मिळवण्यास मदत करतात.
रताळ्यांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.
यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास सहाय्यक ठरते.
रताळ्यांमधील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे हिवाळ्यातील आहारात त्यांचा समावेश करता येतो.
रताळ्यापासून चाट, पराठे, फ्राइज, सूप, भाजी तसेच खीर असे विविध पदार्थ तयार करता येतात. उकडलेले किंवा भाजलेले रताळेही चविष्ट लागतात.
मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रताळे खाताना प्रमाण आणि शिजवण्याची पद्धत याकडे लक्ष द्यावे.
तसेच किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी आहारात त्यांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)