हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Krantee V. Kale
हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. अनेकजण या ऋतूत फिरण्याचा प्लॅन करतात. | All Photos- yandex
जर तुम्ही देखील या हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
फिरायला जाण्यापूर्वी, त्या ठिकाणाचे हवामान आणि तापमानाची माहिती घ्या. बर्फ किंवा पाऊस यासारख्या परिस्थितीसाठी तयार राहा.
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी थर्मल्स, स्वेटर आणि जॅकेट सोबत ठेवा. उबदार कपड्यांमुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होऊन थकवा जाणवू शकतो. यासाठी ड्राय फ्रुट्स, नट्स आणि फळांचा एक डब्बा सोबत ठेवा.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी पडते. म्हणून मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि वॉर्मिंग क्रीम सोबत ठेवा.
प्रवास करताना सर्दी-खोकल्याची औषधे तसेच पेनकिलरसारखी औषधे सोबत ठेवा. तसेच, मास्क विसरू नका.
जर तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करत असाल तर लोकल गाइडची मदत घ्या. ट्रॅव्हल अॅप्स वापरून रस्त्याची, हवामानाची आणि आपत्कालीन माहिती तपासा.
हिवाळ्यातील ट्रिपचा आनंद घेण्यासाठी नियोजन आणि सुरक्षा आवश्यक आहे.