Winter Vacation : थंडीच्या दिवसांत फिरायचंय? महाराष्ट्रातील 'ही' पर्यटनस्थळं आहेत एकदम खास

किशोरी घायवट-उबाळे

महाबळेश्वर - हिवाळ्यात महाबळेश्वरची थंड हवा, हिरवेगार डोंगर आणि स्ट्रॉबेरीच्या बागा पर्यटकांना खास आकर्षित करतात.
पाचगणी - निसर्गरम्य डोंगररांगा, विस्तीर्ण टेबल लँड आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी पाचगणी उत्तम ठिकाण आहे.
माथेरान - वाहनांना बंदी असलेल्या या निसर्गरम्य हिल स्टेशनवर पायी भटकंती, टॉय ट्रेन आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्सचा आनंद घेता येतो.
चिखलदरा - विदर्भातील चिखलदरा हे थंड हवामान, खोल दऱ्या आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध असलेले सुंदर हिल स्टेशन आहे.
भंडारदरा - शांत तलाव, धबधबे, डोंगर आणि निसर्गरम्य परिसरामुळे भंडारदरा हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.
थंड हवेचा अनुभव - शहरातील धावपळ सोडून काही दिवस शांत वातावरणात घालवायचे असेल, तर ही ठिकाणं नक्कीच आवडतील.
फोटोग्राफीसाठी खास - धुक्याने वेढलेले डोंगर, सुंदर सूर्योदय आणि निसर्गाचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळेल.
मग प्लॅन कधी करताय? यंदाच्या हिवाळ्यात कुटुंबीय किंवा मित्रमैत्रिणींसोबत महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)