Women’s Day 2026 : महिला दिनानिमित्त उपयुक्त आणि स्टायलिश गिफ्ट आयडिया; यंदा द्या खास सरप्राईज
किशोरी घायवट-उबाळे
हेल्थ ट्रॅकर/फिटनेस बँड : महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी हेल्थ ट्रॅकर किंवा फिटनेस बँड हा उत्तम पर्याय आहे. हृदयाचे ठोके, पावले, झोपेची माहिती आणि स्टेप्स मोजण्यास मदत होईल.
| (सर्व छायाचित्रे :Yandex)
अरोमाथेरपी किट : तणाव दूर करण्यासाठी अरोमाथेरपी डिफ्यूझर आणि आवश्यक तेलांचे किट उपयुक्त ठरते. हा योग, ध्यान किंवा विश्रांतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
पर्सनल केअर सेट : फेस मास्क, बॉडी लोशन, स्किन केअर क्रिम आणि लिप बाम यांचा सेट रोजच्या जीवनात उपयुक्त ठरेल.
बुक्स / ई-रीडर : वाचनाची आवड असलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी किंवा उपयुक्त पुस्तके, किंवा किंचित खर्चात ई-रीडर भेट म्हणून देऊ शकता.
किचन गॅझेट्स : स्मार्ट ब्लेंडर, स्पाईस ग्राइंडर, एअर फ्रायर, या वस्तू रोजच्या स्वयंपाकात महिलांना मदत करू शकतात.
जिम किंवा योगा मेंबरशिप : स्वास्थ्य आणि फिटनेससाठी जिम, योगा क्लासेसची मेंबरशिप उत्तम गिफ्ट ठरू शकेल.
स्टाइलिश बॅग/पर्स - दैनंदिन उपयोगासाठी स्टायलिश बॅग किंवा पर्स, कामकाज किंवा प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकेल.
हँडमेड/ पर्सनलाइज्ड गिफ्ट : फोटो फ्रेम, कस्टम ज्वेलरी, किंवा नाव/मेसेजसह तयार केलेले उपहार असे गिफ्ट अधिक खास वाटतात.
यांसारखे वेगवेगळे गिफ्ट्स देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना खुश करू शकता.