Women's Day Special : महिलांना फिटनेससाठी ही आसने आहेत लाभदायक

Kkhushi Niramish

वृक्षासन - एका पायावर उभे राहा, विरुद्ध पाय मांडीच्या आतील बाजूस ठेवा आणि तळवे जोडा. संतुलन सुधारते आणि पाय आणि पोट टोन करते.
व्याघ्रसन हे हठयोगातील एक महत्त्वाचे आसन आहे. याला वाघाची मुद्रा असेही म्हणतात. ही गुडघे टेकण्याची मुद्रा आहे. हे आसन केल्याने शरीर लवचिक आणि मजबूत होते. हे शरीरातील चरबी कमी करण्यास देखील मदत करते. तर कंबरदुखीत ही हे आसन लाभदायक आहे.
सुखासन - सुखासन हे अगदी सहज करता येणारे आसन आहे. पायची व्यवस्थित मांडी घालून, पाठीचा कणा ताठ ठेवून नमस्कार मुद्रेत हे आसन करायचे असते. यामुळे मानसिक ताण कमी करण्यात मदत मिळते
धनुरासन - पोट सपाट करते. मासिक पाळीच्या समस्यांमध्ये सर्वोत्तम आसन आहे.
भूजंगासन - भुजंगासन हे महिलांसाठी अत्यंत लाभदायक आसन आहे. भुजंगासन अंडाशय आणि गर्भाशयाला मजबूत करते. यामुळे मासिक पाळी आणि इतर स्त्रीरोगविषयक विकार बरे होण्यास मदत होते.