Women's Day 2026 : महिलांनो, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा! जाणून घ्या बचतीच्या खास टिप्स
किशोरी घायवट-उबाळे
उत्पन्न-खर्चाचा हिशोब ठेवा : दर महिन्याला किती पैसे येतात आणि किती खर्च होतात हे लिहून ठेवा. त्यामुळे बचत किती करता येईल हे स्पष्ट होते.
| (सर्व छायाचित्रे: Yandex)
आपत्कालीन निधी तयार ठेवा : अचानक आलेलं आजारपण किंवा अडचणींसाठी
किमान ५-६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम वेगळी काढून ठेवा.
बचत आणि गुंतवणूक सुरू करा : FD, SIP किंवा PPF (Public Provident Fund) सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. थोडी-थोडी रक्कम नियमित गुंतवल्यास मोठी रक्कम तयार होते.
विमा आणि निवृत्ती नियोजन : आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स घ्या. निवृत्तीची बचत लवकर सुरू केल्यास जास्त फायदा होतो.
कर्ज टाळा : अनावश्यक कर्ज घेऊ नका आणि घेतलं असेल तर वेळेवर फेडा.
निर्णय स्वतः घ्या : आर्थिक बाबतीत स्वतः निर्णय घेतल्यास आत्मविश्वास आणि सुरक्षा वाढते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)