Women's Office Bag Collection: लॅपटॉप, टिफिन, फाईल्स... सगळं मावेल अशा ८ ट्रेंडी बॅग्ज
Mayuri Gawade
ऑफिसला जाताना फक्त स्टायलिश दिसणं पुरेसं नसतं. लॅपटॉप, कागदपत्रं, डबा, पाण्याची बाटली आणि इतर आवश्यक वस्तू सहज मावतील अशी प्रशस्त बॅग निवडणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
स्टाईल, कम्फर्ट आणि उपयोगिता या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणाऱ्या या ऑफिस बॅग्ज तुमचा रोजचा प्रोफेशनल लुक अधिक आकर्षक आणि व्यवस्थित बनवू शकतात.
ही ऑफ-व्हाईट स्ट्रक्चर्ड हँडबॅग मिनिमल डिझाइन आणि गोल्ड मेटल डिटेलिंगमुळे अतिशय एलिगंट दिसते. मोबाईल, वॉलेट, डायरी, मेकअप पाऊच आणि छोटा टिफिन सहज मावतो. फॉर्मल पँट-सूट, कॉटन कुर्ता किंवा सॉलिड साडीसोबत ही बॅग सुंदर दिसते.
या प्रिंटेड टोट बॅगवरील मॉडर्न आर्ट डिझाइन तिला वेगळा लुक देते. यात A4 फाईल्स, नोटबुक, पाण्याची बाटली, टिफिन आणि इतर रोजच्या ऑफिसच्या वस्तू सहज ठेवता येतात. वेस्टर्न ऑफिसवेअर, प्लेन कुर्ती किंवा लिनेन ड्रेससोबत ही बॅग आकर्षक दिसेल.
पेस्टल ग्रीन आणि व्हाईट कॉम्बिनेशन असलेली ही हँडबॅग सॉफ्ट आणि क्लासी लुक देते. मोबाईल, चार्जर, डायरी, सनग्लासेस, कॉस्मेटिक पाऊच आणि आवश्यक कागदपत्रे सहज मावतात. साडी, चिकनकारी कुर्ती किंवा लाईट शेडच्या फॉर्मल ड्रेसवर ही बॅग उत्तम दिसते.
स्काय ब्ल्यू स्ट्रक्चर्ड ऑफिस बॅगमध्ये लॅपटॉप, ऑफिस फाईल्स, टिफिन, पाण्याची बाटली, चार्जर आणि इतर आवश्यक वस्तू आरामात ठेवता येतात. फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स किंवा ऑफिस साडीसोबत ती छान मॅच होते.
ही क्रीम रंगाची टोट बॅग साध्या पण प्रीमियम डिझाइनमुळे रोजच्या ऑफिस वापरासाठी योग्य आहे. यात टिफिन, डायरी, मोबाईल, वॉलेट, छोटा छत्री आणि मेकअप किट सहज मावू शकते. कॉटन साडी, कुर्ता-पालाझो किंवा बिझनेस कॅज्युअल लुकसाठी ती उत्तम पर्याय ठरू शकते.
ब्राऊन लेदर टोट बॅगला बांधलेला प्रिंटेड स्कार्फ तिच्या लुकमध्ये स्टायलिश टच आणतो. यात फाईल्स, टॅबलेट, पाण्याची बाटली, स्नॅक्स बॉक्स आणि दैनंदिन आवश्यक वस्तू सहज ठेवता येतात. जीन्स-शर्ट, ब्लेझर किंवा साध्या प्लेन साडीसोबत ही बॅग आकर्षक दिसते.
ब्राऊन आणि चेक पॅटर्न असलेली ही स्लिंग बॅग ऑफिसनंतरच्या कॅज्युअल मीटिंगसाठीही योग्य ठरते. मोबाईल, वॉलेट, पॉवरबँक, चावी, छोटा नोटपॅड आणि मेकअप पाऊच सहज मावतो. कुर्ती, डेनिम किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटवर ती छान उठून दिसते.
ही सेज ग्रीन मोठी टोट बॅग प्रशस्त असून लॅपटॉप, कागदपत्रे, टिफिन, पाण्याची बाटली, चार्जर, डायरी आणि इतर ऑफिसच्या आवश्यक वस्तू सहज मावतात. प्रोफेशनल ऑफिस लुकसाठी ही बॅग स्टाईल आणि उपयोगिता यांचा उत्तम मिलाफ आहे. | all photos : Pinterest