फुफ्फुसांचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' महत्त्वाचे बदल

किशोरी घायवट-उबाळे

फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय? फुफ्फुसांतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्यास फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. वेळेत निदान झाल्यास उपचाराची शक्यता वाढते | (सर्व छायाचित्रे :Yandex)
धूम्रपानच एकमेव कारण नाही धूम्रपानासोबतच वायू प्रदूषण, स्मोक, धूळ, रसायने आणि रॅडॉन वायू यामुळेही धोका वाढू शकतो.
रोज करा प्राणायाम अनुलोम-विलोम, भस्त्रिका यांसारखे प्राणायाम श्वसनमार्ग निरोगी ठेवण्यास आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतात.
गरम आणि ताजे अन्न खा हलकं, ताजं आणि उबदार अन्न पचन सुधारण्यास मदत करते. थंड आणि अतिजड पदार्थ टाळा.
हळद, आलं आणि मिरीचा वापर करा हळद, आलं, जिरे आणि काळी मिरी यांसारखे मसाले शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात
तुळस उपयुक्त तुळस, यष्टीमधू यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती श्वसनमार्ग निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.
वाफ आणि पुरेशी झोप कोमट पाण्याची वाफ, पुरेशी झोप आणि ध्यान यामुळे श्वसनसंस्था तसेच संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
तंबाखूपासून दूर राहा फुफ्फुसांचा कर्करोग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तंबाखू आणि धूम्रपानापासून पूर्णपणे दूर राहणे.
फुफ्फुसांचा कर्करोग किंवा इतर कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)