International Yoga Day 2026 : योगा मॅटपासून प्रकाशापर्यंत; योगासाठी परफेक्ट रूम कशी असावी?
किशोरी घायवट-उबाळे
स्वच्छ आणि नीटनेटकी जागा निवडा - योगासाठीची खोली स्वच्छ, शांत आणि अनावश्यक वस्तूंमुक्त असावी, त्यामुळे मन एकाग्र राहते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
पुरेसा नैसर्गिक प्रकाश असावा - खोलीत सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत असल्यास योग करताना अधिक उत्साही वाटते.
योगा मॅटचा वापर करा - घसरणार नाही आणि शरीराला आधार देणारी चांगल्या दर्जाची योगा मॅट जवळ ठेवा.
हवाशीर वातावरण ठेवा - योग करताना शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा हवेशीर जागा निवडा.
पाण्याची बाटली जवळ ठेवा - योगानंतर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी जवळ असणे गरजेचे आहे.
आरामदायी कपडे परिधान करा - शरीराची हालचाल सहज होईल असे सैल आणि आरामदायी कपडे घालावेत.
शांत वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा - मोबाईल, टीव्ही किंवा मोठ्या आवाजापासून दूर राहून शांत वातावरणात योगा केल्यास अधिक लाभ मिळतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)