'रील'मधून सुरू झालेलं 'रिअल' प्रेम आता तुटलं? योगिता- सौरभच्या नात्यात नेमकं काय बिनसलं?
Mayuri Gawade
‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अंतरा आणि मल्हार ही जोडी आता खऱ्या आयुष्यात मात्र वेगवेगळ्या वाटांवर गेल्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं असून, त्यांनी त्यांचे लग्न आणि हनिमूनचे सर्व फोटोही हटवले आहेत.
विशेष म्हणजे, या वर्षीची दिवाळी दोघांनी वेगवेगळी साजरी करत ते फोटो सोशल मिडियावर शेअर केले. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा अधिकच वाढल्या.
काही महिन्यांपूर्वीच हे दोघे ‘रील टू रिअल’ कपल म्हणून चर्चेत होते; मालिकेच्या सेटवरूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली होती.
तीन वर्षांच्या मैत्रीनंतर आणि एका वर्षाच्या डेटिंगनंतर त्यांनी ३ मार्च २०२४ रोजी लग्न केलं होतं.
सौरभने योगिताला बोटीवर फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं, आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेनेच नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
आता मात्र दोघांनी एकमेकांबद्दल पूर्ण मौन पाळलं असून, योगिताने "पर्सनल लाईफबद्दल बोलायचं नाही" असं सांगितलं.
चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे, कारण जे प्रेम मालिकेच्या पडद्यावर सुरू झालं, ते खऱ्या आयुष्यात एवढ्या लवकर संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.