जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या घरी पाळणा हालला; 'हे' ठेवलंय बाळाचं नाव

Kkhushi Niramish

जहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या घरी पाळणा हालला असून दोघांनीही मोठ्या आनंदात आपल्या बाळाचे स्वागत करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सागरिका आणि जहीरने बुधवारी ही गोड बातमी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या अनेक चाहत्यांसह हुमा कुरेशी, अंगद बेदी, करन सिंग ग्रोव्हर, नीरू बजवा, डायना पेंटी यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, क्रिकेटपटू आकाश चोप्रा, आरपी सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
जहीर आणि सागरिका एकमेकांना आधीपासून डेट करत होते. युवराज सिंग आणि हॅझेल कीचच्या लग्नात त्यांनी आपलं नातं सर्वांसमोर जहीर केलं.
सागरिका आणि जहीरने २४ एप्रिल २०१७ रोजी साखरपुडा करत त्याच वर्षी 23 नोव्हेंबरला त्यांनी मोठ्या थाटात लग्न केले.
सागरिकाने २००७ मध्ये ‘चख दे! इंडिया’ या शाहरुखच्या चित्रपटातून पदार्पण केले. यात तिने सामना जिंकून देणाऱ्या हॉकीपटू प्रीती सबरवालची भूमिका साकारली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटातही ती एका क्रिकेटपटूला डेट करताना दाखवण्यात आली होती. त्यानंतर ती ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’, आणि मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकली. २०१५ मध्ये ती ‘खतरों के खिलाडी ९’ या रिअ‍ॅलिटी शोची फायनलिस्ट होती.
लग्नानंतर ८ वर्षांनी दोघेही आई-वडील झाले आहेत. मुलाचे नाव ठेवताना त्यामध्ये दोघांच्याही घराण्यांच्या पारंपारिकतेशी जवळीक साधेल याचा विचार केला आहे.
'फतेहसिंह' हे नाव सागरिकाच्या राजघराण्यातील वारशाचा सन्मान म्हणून निवडले असून तिचे वडील विजयसिंह घाटगे यांच्या नावावरून त्यांनी हे नाव निवडले आहे. तर 'खान' हे जहीरचे आडनाव आहे.