Jawa 350 ची नवीन रेंज लॉन्च, 4 नवे रंग अन् अलॉय व्हीलची सुविधा; जाणून घ्या किती आहे किंमत?

नवीन Jawa 350 रेंज आता अलॉय व्हील आणि स्पोक व्हील या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Jawa 350 ची नवीन रेंज लॉन्च, 4 नवे रंग अन् अलॉय व्हीलची सुविधा; जाणून घ्या किती आहे किंमत?
Published on

टू-व्हीलर मेकर जावा मोटरसायकलने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन Jawa 350 रेंज लॉन्च केली आहे. तरुण रायडर्सना आकर्षित करण्यासाठी ही मोटारसायकल 4 नवीन कलर पर्यायांसह आणि अलॉय व्हील्ससह ही लॉन्च करण्यात आली आहे. नवीन Jawa 350 ची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन Jawa 350 रेंज आता अलॉय व्हील आणि स्पोक व्हील या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

किंमत: Jawa 350 लाइनअपच्या स्पोक व्हील्स बेस व्हेरियंटची किंमत 1,98,950 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही तीन नवीन रंगांमध्ये (ऑब्सिडियन ब्लॅक, ग्रे आणि डीप फॉरेस्ट) लॉन्च केली गेली आहे.

तर अलॉय व्हील्सने सुसज्ज असलेल्या Jawa 350 ची किंमत 2,08,950 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. स्पोक व्हील्ससह जावा 350 क्रोम व्हेरिएंटची किंमत 2,14,950 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

जावा 350 क्रोम प्रकार आता चार रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे (मॅरून, ब्लॅक, मिस्टिक ऑरेंज आणि व्हाइट). त्यात आता पांढऱ्या रंगांची भर पडली आहे. तर अलॉय व्हीलसह येणाऱ्या क्रोम व्हेरियंटची किंमत 2,23,950 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

डिझाईन: जावा 350 बाईक तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. नवीन जावा 350 च्या डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास तिला नवीन डबल कार्डल फ्रेमवर विकसित केले गेले आहे. ही बाईक रेट्रो डिझाइन लुकमध्ये आहे.

जावा 350 बाईकच्या डायमेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या सीट उंची 790 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 178 मिमी आहे. या बाईकचे वजन 192 किलो आहे. रायडरच्या सोयीसाठी, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.

पॉवरट्रेन: Jawa 350 लाइनअपमध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 22.2bhp पॉवर आणि 28.2Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

नवीन जावा 350 लाइनअपमध्ये पुढील बाजूस 35 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक सस्पेन्श देण्यात आलं आहे. हे सस्पेन्शन रायडरला खडबडीत भूभागावरही सहजतेने गाडी चालविण्यास मदत करते.

कंपनीचा दावा आहे की, जावा 350 सुमारे 135 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास ही बाईक 18 ते 22 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

logo
marathi.freepressjournal.in