Akshay Kumar meet Raj Thackeray : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ‘शिवतीर्था’वर' घेतली राज ठाकरेंची भेट...

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार
Akshay Kumar meet Raj Thackeray : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ‘शिवतीर्था’वर' घेतली राज ठाकरेंची भेट...
@mnsadhikrut

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या नवनवीन भूमिकेतून चर्चेत असतो. तो लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अक्षय कुमार हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने नुकतेच त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने शुक्रवारी, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी राजसाहेबांची सदिच्छा भेट घेतली, असे कॅप्शन देऊन मनसेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची अनेक मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नेमकी कशी असेल, त्यासाठी अजून काय मेहनत घ्यावी लागेल, याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी त्याने राज ठाकरेंची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in