Akshay Kumar in Marathi Movie : अक्षय कुमारने केला मोठा खुलासा; शिवाजी महाराज यांच्यामुळे साकारतोय असे का म्हणाला?

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा मराठीमध्ये पदार्पण करणार असून तो या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
Akshay Kumar in Marathi Movie : अक्षय कुमारने केला मोठा खुलासा; शिवाजी महाराज यांच्यामुळे साकारतोय असे का म्हणाला?

मराठी तसेच हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा मराठीमध्ये पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याचा फर्स्ट लूकही यावेळी दाखवण्यात आला.

अक्षय कुमार (Akshay Kumar) याने यावेळी सांगितले की, " मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. महाराजांची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न कारेन."

२०२३मध्ये ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे हा प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसेल. तर बिग बॉसमध्ये प्रसिद्धी मिळवलेला उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणारा अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in