मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

दिग्गज महिला कलाकारांकडून एका कष्टकरी महिलेचा अपमान होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

एका ऑनलाइन मासे विक्रेत्या कंपनीचे प्रमोशन करताना मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे मराठी सिने-अभिनेत्री वर्षा उसगावकारांनी म्हटल्याने मुंबईतील मासे विक्रेत्या कोळी महिला चांगल्याच संतापले आहेत. उसगावकार यांनी केलेले हे वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय असुन दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. उसगावकर यांनी माफी मागावी अन्यथा मासे विक्रेत्या कोळी महिला उसगावकारांना सडलेले मासे खाऊ घालतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला आहे.

मराठी सिने सृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून एका कष्टकरी महिलेचा अपमान होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत आहे. उसगावकारांनी जर मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी नाही मागितली तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन सडलेले मासे त्यांना खाऊ घालण्याचा निर्धार मुंबतील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी घेतला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिली आहे.

गोवा राज्यातून आलेल्या परप्रांतीय उसगावकारांनी महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कोळी महिलांचा हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. मुंबईत बाहेरून आलेले उपरे मुंबईचे आद्य नागरिक कोळी समाजाच्या मनगटावर येऊन बसले असल्याचे दुर्दैवी चित्र आता रोजचे होऊ लागल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in