नवाजुद्दीन सिद्दीकीने आगामी चित्रपट 'हुड्डी'मध्ये ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर

अनोखे आणि खास पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने आगामी चित्रपट 'हुड्डी'मध्ये ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित आगामी चित्रपट 'हड्डी'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी तसेच, आणखी कलाकार पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. अशातच, नवाजुद्दीन या चित्रपटात एक अनोखे पात्र साकारणार असून, त्याने 'हड्डी'साठी वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याच्या त्याचा अनुभव शेअर केला.

अनोखे आणि खास पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ८० हून अधिक ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा आपला अनुभव शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करणे हा एक अनोखा अनुभव आहे, या समाजाबद्दल अधिक समजून घेणे आणि त्यांना जाणून घेणे हे माझे सौभाग्य होते. त्यांची येथील उपस्थिती प्रभावी होती." नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित 'हुड्डी' २०२३ मध्ये प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in