
बॉलिवूडमध्ये सध्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही चांगलीच चर्चेत आहे. श्रद्धाचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने पुणेकरांना भेट दिली. व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस साजरा केला. या पुणे दौऱ्यादरम्यान श्रद्धा कपूरने सेवेन वंडर्स येथे देखील भेट दिली. तसेच, येथील प्रसिद्ध आयफेल टॉवरखाली अभिनेत्रीने वडापावचा आस्वाद घेतला. इतकेच नव्हे तर, श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध मिसळचा आनंद घेऊन आपला दौरा पूर्ण केला.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, ८ मार्च २०२३ रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.