
संजय लीला भन्साळी यांचा 'सुकून' या अल्बमची चर्चा सर्वत्र होत आहे. या अल्बममधील 'करार' नावाचे एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने श्रेया घोषालचा एक व्हिडिओ सादर केला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या म्युझिक अल्बममधील हृदयस्पर्शी गाणे 'करार'चा म्युझिक व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आहे.
'करार' हे क्लासिक गाणे आहे ज्याला श्रेया घोषालने री-क्रिएट केले आहे. तसेच, हे मूळ गाणे बेगम अख्तर यांनी गायले होते. अख्तरीबाई फैजाबादी, एक भारतीय गायिका आणि अभिनेत्री होत्या ज्यांना बेगम अख्तर या नावानेही ओळखले जाते. तरुणांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या म्युझिकल नोट्ससह 'सुकून' प्रेक्षकांची मने जिंकत आहे.