Subodh Bhave : सुबोध भावे आता दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत; म्हणाला, लहानपणापासून ज्याच्या गोष्टी ऐकल्या...

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आता आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.
Subodh Bhave : सुबोध भावे आता दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत; म्हणाला, लहानपणापासून ज्याच्या गोष्टी ऐकल्या...

'हर हर महादेव' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आता आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'ताज' (Taj) या हिंदी वेब सिरीजमध्ये तो 'बिरबल'ची भूमिका साकारणार असल्याची पोस्ट त्याने केली आहे. यावेळी पोस्टमध्ये तो म्हणाला की, "लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या, ज्याच्या हुशारी वर प्रेम केले, त्या बिरबलची व्यक्तिरेखा या आगामी वेब सिरीजमध्ये साकारताना अत्यंत आनंद होत आहे." अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. प्रत्येक भूमिकेमध्ये आपले वेगळेपण जपणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. त्याने आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. फक्त हिरोच नव्हे तर नकारात्मक भूमिकादेखील त्याने केल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने अनेक चरित्रपट केले आणि ते हिटही झाले. 'बालगंधर्व', 'लोकमान्य', 'डॉ.काशिनाथ घाणेकर' असे अनेक चरित्रपट केले आहेत.

हेही वाचा :

यापुढे मी ऐतिहासिक चित्रपट करणार नाही; असं का म्हणाला सुबोध भावे?

नुकतेच सुबोधने 'हर हर महादेव'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या चित्रपटावरून झालेल्या वादानंतर तो हात जोडून म्हणाला होता की, "मी यापुढे बापजन्मात कुठल्याही ऐतिहासिक चरित्रपटात काम करणार नाही'' मात्र, त्याने सध्या केलेल्या या घोषणेमुळे त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तर काहींनी त्याच्या या निर्णयाचा विरोधदेखील केला आहे. त्यामुळे आता त्याच्या 'बिरबल'च्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in