दिल्लीपासून ते स्पेनपर्यंत झाले 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाचे शूटिंग

या सिनेमात रणबीर कपूर - श्रद्धा हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार
दिल्लीपासून ते स्पेनपर्यंत झाले 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाचे शूटिंग
Published on

'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'दे दे प्यार दे' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे लव रंजन हे आजच्या काळात प्रेम आणि नातेसंबंधांना धरून आपल्या अनोख्या अंदाजसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट कायम पाहायला मिळते ती म्हणजे सुंदर सेट्स आणि सुंदर आऊटडोर लोकेशन्स. त्यांचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'चे चित्रीकरण देखील काही अविस्मरणीय लोकेशन्सवर झाले. लव रंजनने चित्रपटाचे काही शूटिंग दिल्लीत केले आहे. चित्रपटाचा मोठा भाग स्पेनमध्ये शूट करण्यात आला. तसेच, या सिनेमात रणबीर कपूर - श्रद्धा हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

प्रोडक्शनच्या एका सूत्राने असे सांगितले की, "हा चित्रपट प्रामुख्याने रोमान्सभोवती फिरत असल्याने आणि प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींना एका ट्विस्टसह उत्कृष्ट प्रकारे दाखवत पिक्चर परफेक्ट बनवण्यासाठी आम्हाला एक सुंदर सेटिंग आणि बॅकड्रॉपची आवश्यकता होती. अनेक लोकेशन्सचा शोध घेतल्यानंतर, टीमला स्पेनमधील सुंदर लोकेशन्स आवडले, ज्याचे रिजल्ट्स खूप चांगले आले आहेत. प्रेक्षक केवळ रणबीर आणि श्रद्धा यांच्या आकर्षक जोडीच्या प्रेमात पडणार नाहीत, तर मोठ्या पडद्यावर प्रकाश टाकणाऱ्या सुंदर लोकेशन्सच्याही प्रेमात पडतील."

या चित्रपटात प्री-अ-पोर्टर फॅशन ट्रेंडपासून ते तरुणांच्या विनोदांपर्यंत तसेच रोमान्सच्या दृष्टीपासून भटकंतीपर्यंत तरुणांच्या अशा गोष्टी पाहायला मिळतील. तसेच, हा चित्रपट २०२३ मध्ये नक्कीच पाहण्यासारखा ठरेल. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, ८ मार्च २०२३ला होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

logo
marathi.freepressjournal.in