अभिनेता हृतिक रोशन पुन्हा लग्न करणार ?

बॉलिवूडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, हृतिक-सबा लग्न करण्याच्या तयारीत आहेत.
अभिनेता हृतिक रोशन पुन्हा लग्न करणार ?

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानबरोबर अनेक वर्षे संसार केल्यानंतर दोघेही विभक्त झाले. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. यापूर्वी हृतिक-सबाला बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आले होते. दोघांचे फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता हृतिक-सबा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

बॉलिवूडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, हृतिक-सबा लग्न करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत अद्याप हृतिक-सबाने न बोलणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वीच हृतिक-सबा लंडन येथे गेले होते. दोघांनी एकमेकांना एकत्रित वेळ दिला तिथपासूनच हृतिक-सबाच्या लग्नाच्या चर्चांनी अधिक जोर धरला. सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली; पण अद्याप हृतिक-सबाने आपल्या नात्याची जाहीर कबुली देणे टाळले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in