अमेरिकेत टेक्सास येथील शाळेत गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेत टेक्सास येथील शाळेत गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास येथील शाळेत एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तीन शिक्षकांनीही आपले प्राण गमावले आहेत. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १८ वर्षीय हल्लेखोर तरुण ठार झाला आहे. या घटनेची टेक्सासचे गव्हर्नर ग्रेह एबॉट यांनी माहिती दिली. शाळेत घडलेल्या या भीषण घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

टेक्सासच्या उवाल्डे शहरात ‘रॉब एलिमेंट्री स्कूल’ या शाळेत ही भीषण गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोर तरुण याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी तरुणाने आपली गाडी शाळेबाहेरच लावली होती. त्यानंतर शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात १८ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत. हल्लेखोरालाही ठार करण्यात आले आहे. हल्लेखोराजवळ एक हँडगनही आढळली.

हल्लेखोराने आजीवरही केला हल्ला

सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जाण्याआधी हल्लेखोराने आपल्या आजीला गोळी घातली होती. यानंतर त्यांना सॅन एंटोनियो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजीला गोळी घातल्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता. यानंतर तो शाळेत पोहोचला आणि त्याने विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

बंदुकींवर बंदी आणण्याचे

बायडेन यांचे संकेत

या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केले आहे. तसेच आपण केव्हा या गन लॉबीविरोधात उभे राहणार आहोत? अशी विचारणा केली आहे. दरम्यान, अमेरिकेत घडलेल्या या घटनेनंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in