शाहीनबाग परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुन्हा सुरू

शाहीनबाग परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुन्हा सुरू

दिल्लीतील शाहीनबाग परिसरातील मंगोलपुरी आणि न्यू फ्रेंड्स कॉलनी भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी पुन्हा एमसीडीचे पथक बुलडोझरसह दाखल झाले असून या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाले आहे. सोमवारीसुद्धा सकाळी अकराच्या सुमारास एमसीडीचे पथक अतिक्रमण हटवण्यासाठी तिथे पोहोचले होते. मात्र, लोकांच्या प्रचंड विरोधामुळे कोणतीही कारवाई न करता पथकाला परतावे लागले होते. त्यामुळे मंगळवारी पुन्हा संपूर्ण बंदोबस्तासह ही कारवाई सुरू करण्यात आली.

दरम्यान, शाहीन बागला राजकारणाचा आखाडा बनवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहीनबागेतील अतिक्रमणांच्या कारवाईचा मुद्दा गाजत आहे.

अतिक्रमण हटवण्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगोलपुरी उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येते, तर न्यू फ्रेंड्स कॉलनी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येते. या दोन्ही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in