वॉशिंग्टन : जगभरात अण्वस्त्र स्पर्धा वेगात सुरू आहे. जगातील पहिला अणुबॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकला. त्यात जपानची हिरोशिमा व नागासाकी ही शहरे बेचिराख झाली. आता हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तीचा अणुबॉम्ब बनवण्याची तयारी अमेरिका करत आहे.
या अणुबॉम्बचे नाव बी ६१-१३ आहे. हा बॉम्ब बी ६१ श्रेणीतील १३ वा बॉम्ब असेल. हा ग्रॅविटी स्वरूपाचा बॉम्ब असेल. तो थेट टार्गेटवर टाकला जाऊ शकतो. हा बॉम्ब बनवण्याचे काम राष्ट्रीय अणू सुरक्षा प्रशासनाच्या अंतर्गत केले जात आहे.
चीनने आपली अण्वस्त्र दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अमेरिकेनेही हा नवीन बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकली, तर रशिया अण्वस्त्र चाचण्यांच्या परीक्षणाच्या करारातून बाहेर पडला आहे.
बी ६१-१३ हा अणुबॉम्ब बी ६१-७ सारखाच असेल. मात्र त्या सुरक्षा व नियंत्रणाचे फिचर्स अधिक चांगले असतील. त्यामुळे हा बॉम्ब थेट ‘टार्गेट’वर टाकता येईल.
१९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे नाव ‘लिटील बॉय’ होते. ज्यावेळी हा बॉम्ब हिरोशिमावर पडला. तेव्हा त्याची लोकसंख्या ३.२० लाख होती. या बॉम्बमुळे १९४५ च्या अखेरपर्यंत हिरोशिमातील १.४५ लाख जणांचा मृत्यू झाला. लिटिल बॉयचे वजन ९७०० पौंड होते. १४१ पौंड युरेनियम आहे, तर नवीन बी-६१-१३ चे वजन ३६० किलोटन आहे. यात प्लुटोनियम आहे.
केवढा हाहाकार माजेल?
हिरोशिमावर जो बॉम्ब पडला होता त्यातून ६६५० अंश ऊर्जा निघाली होती. आता त्या बॉम्बपेक्षा २४ पट बॉम्ब पडल्यास किती ऊर्जा निघेल याचा विचार करू शकता. हा बॉम्ब जेथे पडेल तेथून ६ किमी परिसरात आग लागेल, तर १०० किमीपर्यंतची जमीन उद्ध्वस्त होईल.
मानवाधिकार संघटना ‘वेजिंग पीस’ने सांगितले की, ३०० किलो टनपेक्षा जास्तीचा अणुबॉम्ब पडल्यास ६ तास आग जळत राहील, तर १०० किमी परिसरातील पर्यावरण खराब होईल. हा बॉम्ब पडल्यास १० लाख जण तत्काळ मृत पावतील. तसेच २० लाख लोक जळतील.