पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या पथकावर हल्ला

दोन दहशतवादी ठार : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी
पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या पथकावर हल्ला

ग्वादार : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी चिनी अभियंत्यांच्या एका पथकावर हल्ला करण्यात आला आहे. सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिस कारवाईत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी जवळपास साडे नऊ वाजता हा हल्ला झाला होता आणि त्यानंतर बराच वेळ दहशतवादी आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्ष सुरू होता. स्थानिक न्यूज ‘बलुचिस्तान पोस्ट’च्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या ग्वादार शहरात स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी चिनी अभियंत्यांवर हल्ला झालेल्या घटनेची पुष्टी केली आहे. चिनी अभियंत्यांवरील हल्ला फकीर कॉलोनीच्या जवळ झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स उभारले आहेत. रविवारी उशीरापर्यंत पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असल्याचे माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तानमधील चीनच्या राजदुतांनी चिनी नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. माहितीनुसार, चिनी अभियंत्यांच्या चमुवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ विरोधी हल्ला सुरु केला. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. काही दहशतवादी जखमी अवस्थेतच पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन पोलिस कर्मचारी देखील या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in