चीनला सीमा वाद संपवायचा नाही,तो त्याला कायम ठेवायचा आहे ; मनोज पांडे

चीनला सीमा वाद संपवायचा नाही,तो त्याला कायम ठेवायचा आहे ; मनोज पांडे

चीनला सीमा वाद संपवायचा नाही. तो त्याला कायम ठेवायचा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सोमवारी केले.

लष्करप्रमुखपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, चीनला सीमा वाद कायमच ठेवायचा आहे. एप्रिल २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती ‘जैसे थे’ होती. तशीच ती राहायला हवी. तसेच दोन्ही देशांमध्ये विश्वास व मित्रत्वाचे नाते निर्माण व्हायला हवे. मात्र, एकाच्याच प्रयत्नाने हे होणार नाही, असा टोला त्यांनी चीनला हाणला.

भारतीय जवान पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ठामपणे उभे आहेत. ते कोणत्याही आपात्कालिन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आमचे जवान महत्वपूर्ण पोझिशनवर बसले असून कोणतीही आगळीकीचा प्रयत्न हाणून पाडण्याचे सख्त आदेश त्यांना दिलेले आहेत, असे पांडे म्हणाले.

भारत व चीनमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातून भविष्यात मार्ग निघू शकेल, असा मला विश्वास वाटतो. मात्र, सीमेवर कोणतीही चुकीची कृती सहन केली जाणार नाही. चर्चेतून उत्तर व दक्षिण पँगँग सरोवर, गोगरा व गलवान घाटी येथील मुद्यांचे समाधान झाले आहे. सैन्याची कुटनीती हा परराष्ट्र कुटनीतीचा हिस्सा आहे. त्याच्याकडे वेगवेगळे बघितले जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in