
डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप करुलकरांनी भारतीय क्षेपणास्त्राची गोपणीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता त्यांनी पदावर असताना केलेले एकएक उद्योग समोर आले आहेत. डीआरडीओचे संचालक असताना कुरुलकर यांनी दोन महिलांचे लैंगितक शोषण केल्याचं देखील समोर आली आहे. डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवेगळ्या कामांची कंत्राट देण्याचे अधिकार कुरुलकर यांच्याकडे होते. ही कंत्राट देताना त्यांनी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्यानंतर त्यांना कंत्राट दिल्याचं समोर आलं आहे. याबातची माहिती पीडित महिलांनी आपल्या जबानीत म्हटलं आहे.
एटीएसने हनिट्रपमध्ये अटकून पाकिस्तानला क्षेपणास्त्राची माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करुन तपासणी सुरु केली. त्यावेळी एटीएसला कुरुलकरांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप चाट आढळून आले. तसंच कुरुलकरांनी गेल्या वर्षभरात ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला होता. त्याठिकाणी एटीएसकडून तपास करण्यात आला. या तपासात मुंबईतील कलिना इथल्या गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर वेगवेगळ्या सहा महिलांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं. या महिलांची चौकशी केल्यावर त्यापैकी दोन महिलांनी कुरुलकरांनी लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं.
झारा दास गुप्ता या बनावट आयडीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या हनी ट्रपमध्ये कुरुलकर अडकले. कुरुलकर यांची एक रंगेल अधिकारी अशी ओळख असल्याने त्यांच्याबाबतची सगळी माहिती काढून त्यांना अडकवण्यात आलं. झारा दास गुप्ताने क्षेपणास्त्रात अभ्यास करणारी विद्यार्थी म्हणून प्रदीप करुलरकरांशी संपर्क केला. तिने डॉक्टरेट मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती कुरुलकरांना केली. यानंतर पुढे दोघांची खासगी चर्चा सुरु झाली. पुढे त्यांचा संवाद एकमेकांना बेब आणि हनी म्हणण्यापर्यंत पोहचला.