Another wave of layoff : ट्विटर, ॲमेझॉननंतर 'या' प्रसिद्ध कंपनीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!

ट्विटर, ॲमेझॉन, मेटा सारख्या दिग्गज कंपंनीने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली. त्यानंतर आता आणखी एका कंपनीतही शेकडो लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे.
Another wave of layoff : ट्विटर, ॲमेझॉननंतर 'या' प्रसिद्ध कंपनीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!

गेल्या काही महिन्यांमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवरील काही सुप्रसिद्ध कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी पाठवले आहे. यामध्ये ट्विटर, ॲमेझॉन, मेटावर्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अशामध्ये आता खाद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी 'पेप्सिको'नेदेखील काही कठोर पाऊले उचलली आहेत. वॉल स्ट्रिटच्या माहितीनुसार, शीतपेये बनवणाऱ्या या कंपनीने आर्थिक मंदीचा संभाव्य धोका पाहता अनेक कर्मचाऱ्यांना हटवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काळात पेप्सिको कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नलनुसार, पेप्सिको कंपनीने सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, तंत्रज्ञान आणि मीडिया विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पेप्सिको कंपनी ही वेफर्स, क्वेकर ओट्स, डोरिटोस आणि कोल्ड ड्रिंक्ससारख्या अनेक गोष्टींचे उत्पादन करते. पेप्सिकोच्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच कंपन्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीपासून याची सुरुवात झाली ते पुढे ॲमेझॉन, ट्विटर, मेटा, ॲपल या टेक कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in