
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले असून तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लवकरच ते सहाव्या ‘भारत-जर्मनी इंटर-गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन’साठी (आयजीसी) जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासह सहभागी होतील. त्यानंतर ते बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.
यानंतर ३ मे रोजी ते इंडो-नॉर्डिक परिषदेत ते सहभागी होतील आणि त्यानंतर डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये भारतीयांना संबोधित करतील. अखेरीस पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.
बर्लिनला पोहोचताच पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. त्यांनी लिहिले की, ते चॅन्सलरओलाफ स्कोल्झ यांच्याशी चर्चा करणार असून व्यावसायिक नेत्यांचीही भेट घेणार आहेत आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.