टेनिसपटु त्सोंगाने केले टेनिसला अलविदा

टेनिसपटु त्सोंगाने केले टेनिसला अलविदा

फ्रेंच ओपन टेनिसच्या पुरुष एकेरी गटात आठव्या मानांकित कॅस्पर रूडकडून पहिल्याच फेरीत पराभव होताच फ्रान्सच्या जो-विलफ्राइड त्सोंगाने अत्यंत भावविवश होत टेनिसला अलविदा केले. िनवृत्तीबाबत त्याने गेल्याच आठवड्यात िनर्णय घेतला हाेता.त्सोंगाला रूडने ६-७, ७-६, ६-२, ७.६ असे पराभूत केले. आपल्या कारकीर्दीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानापर्यंत पोहोचलेला त्सोंगा २००८ च्या ऑस्ट्रेलियाई ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तो डेव्हिस कप विजेत्या फ्रान्सच्या संघातही होता. अनेकदा त्याला दुखापतींनी सतावले.

गेल्या वर्षी ३६व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्याने वर्षातून केवळ १८ सामने खेळण्याचेच ठरविले होते. आपले कुटुंबीय आणि प्रेक्षक यांच्यापुढे निवृत्तीची घोषणा करताना त्सोंगा म्हणाला की, मी जिंकलो असतो, तर आणखी चांगले झाले असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in