कोरोनाचा चौथा डोस तिसऱ्या डोसहून अधिक प्रभावी असल्याचा संशोधकांनी केला दावा

कोरोनाचा चौथा डोस तिसऱ्या डोसहून अधिक प्रभावी असल्याचा संशोधकांनी केला दावा

फायझर व मॉडर्ना लसीचा चौथा डोस सुरक्षित असून यामुळे तिसऱ्या डोसच्या तुलनेत शरीरात जास्त इम्युनिटी तयार होते, असा दावा ब्रिटिश संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘द लांसेट इन्फेक्शिअस डिसीज जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे.

ब्रिटिश सरकार रोगप्रतिकारक क्षमता दुबळी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीचा चौथा डोस देत आहे. त्याला स्प्रिंग बूस्टर म्हणून ओळखले जात आहे. संशोधकांच्या मते, या संशोधनाचा संपूर्ण डेटा उजेडात येण्यापूर्वी जनतेतील अँटीबॉडीचा स्तर अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून डोस दिला जात आहे. चालू वर्षाच्या अखेरीस उर्वरित जनतेलाही हा डोस दिला जाईल.

१६६ जणांवर संशोधन

या संशोधनात १६६ जणांचा समावेश होता. त्यांनी गतवर्षी जून महिन्यात फायझर किंवा अॅस्ट्राझेनेका लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर फायझरचा तिसरा डोस घेतला होता. लसीच्या मिक्स अँड मॅचच्या या संशोधनात सहभागी लोकांना फायझरचा संपूर्ण डोस किंवा मॉडर्नाचा अर्धा डोस चौथा डोस म्हणून देण्यात आला. तिसऱ्या व चौथ्या डोसमध्ये ७ महिन्यांचे अंतर ठेवण्यात आले.

कोणतेही दुष्परिणाम नाहीत

चौथ्या डोसमुळे नागरिकांत थकवा व हातात काही वेळ वेदना होण्याची किरकोळ लक्षणे दिसून आली. वैज्ञानिकाच्या मते, लसीचे साइड इफेक्ट्समध्ये लोकांना थकवा व हातातील वेदना वगळता अन्य कोणत्याही वेदना जाणवल्या नाही. म्हणजे हा डोस लोकांनी चांगल्या प्रकारे सहन केला. यामुळे लसीचा चौथा डोस सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले. स्प्रिंग बूस्टरमुळे जनतेतील रोगप्रतिकारक क्षमता पूर्वीच्या बूस्टरपेक्षा चांगलीच वाढल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

No stories found.