वॉशिंग्टन : पाकिस्तानने अमेरिकेसोबत नवीन सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही देशात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवीन संरक्षण भागीदारी सुरू होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून नवीन शस्त्रास्त्रे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.