तेल अवीव : हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यातील काही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी इस्रायलची सेनादले आता प्रशिक्षित पक्षांचा वापर करत आहे. त्यांना पर्यावरण शास्त्रज्ञांकडून जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची मदत मिळत आहे.
इस्रायलच्या नेचर अँड पार्क्स ऑथॉरिटीचे ओहद हॅटझोफे जीपीएस ट्रॅकिंग उपकरणांचा वापर करून पक्ष्यांच्या स्थलांतरित पद्धतींचा मागोवा घेतात. सेनादलांनी त्यांना २३ ऑक्टोबर रोजी मदत मागितल्यानंतर त्यांच्या डेटामुळे चार मृतदेह शोधण्यात मदत झाली. इस्रायली पर्यावरणशास्त्रज्ञांनी प्रथम इस्रायलमध्ये जन्मलेल्या एका पांढऱ्या शेपटीच्या गरुडाच्या माहितीचे पुनरावलोकन केले. तो नुकताच मॉस्कोच्या उत्तरेकडील लांबच्या स्थलांतरातून खूप भुकेलेला परतला होता. हॅटझोफे यांनी त्याच्या हालचालींचा आढावा घेतला आणि गरुड जेथे थांबला होता ती ठिकाणे निवडली. त्यानंतर त्याने तो डेटा इस्रायलच्या सेनादलांसोबत शेअर केला. त्यातून त्यांना चार मृतदेह सापडले.
हॅटझोफे जीपीएस ट्रॅकिंग उपकरणांद्वारे पक्षी कुठे थांबतात याचा मागोवा घेतात. ट्रॅकर्स पक्षी कसा फिरत आहे, तो कोणत्या उंचीवर आहे आणि इतर डेटा पॉइंट्स सांगू शकतात. त्यानंतर त्या माहितीचा उपग्रह छायाचित्रांसह संदर्भ देतात. त्याच्या आधारे मृतदेह शोधण्यास मदत होत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर हॅटझोफे जे काम करतात त्यामुळे त्यांना लष्करी सेवेसाठी बोलावण्यात आले आहे. पक्ष्यांच्या हालचालींबद्दल आणि त्यांच्या वागणुकीबद्दलचे त्यांचे ज्ञान वापरून लोकांना मदत करण्यास ते उत्सुक आहेत.