दहावी अन् बारावी बोर्डाच्या परिक्षेचे टेन्शन आले आहे? 'या' टिप्स वापरून दूर करा परीक्षेचा स्ट्रेस

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात
दहावी अन् बारावी बोर्डाच्या परिक्षेचे टेन्शन आले आहे? 'या' टिप्स वापरून दूर करा परीक्षेचा स्ट्रेस
PM

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात, पण खूप वेळा परीक्षा जवळ येऊ लागली की मुलांना अधिक स्ट्रेस येऊ लागतो. अशावेळी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

चांगल्या आणि आरामदायक ठिकाणी अभ्यासासाठी बसा-

या मध्ये सर्व प्रथम अभ्यास करण्यासाठी योग्य ठिकाणी बसणे हे खूप आवश्यक आहे. अशा ठिकाणी जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. तसेच अभ्यास करताना बराचवेळ एकाच ठिकाणी बसावे लागते तेव्हा ती जागा आरामदायक असणे ही खूप गरजेचे आहे.

अभ्यासा दरम्यान ब्रेक घेणं आवश्यक-

परीक्षाजवळ आली की मुलांना खूप भीती वाटते त्यासाठी ते फक्त अभ्यास आणि अभ्यास करतात त्यामुळे त्याचा तणाव अधिक वाढतो. तेव्हा अभ्यास करताना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यायला हवा. यावेळेत तुम्ही काहीवेळ मैदानी किंवा इनडोअर खेळ खेळू शकता.

पुरेशी झोप घेणे आवश्यक-

बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना ताण आणि टेन्शन येत असतं. परंतु या दरम्यान चांगली झोप देखील आवश्यक आहे. 7 ते 8 तासाची झोप मिळाल्यामुळे तुम्ही फ्रेश राहता आणि आरोग्य देखील चांगले राहते.

खाण्यापिण्याकडे लक्ष देणे-

परीक्षेचा अभ्यास करताना योग्य आहार घेणे देखील गरजेचे आहे. संतुलित आहारामधून पोषकतत्व मिळतात आणि शरीराला एनर्जी प्राप्त होते. परीक्षा सुरु असताना बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे आणि अधिकतर घरातील सकस आहाराचे सेवन करावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in