रेड वाईनचे तोटे ऐकले आहेत? चला आज फायदे घेऊयात जाणून!

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो आणि कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती उत्तमच असते
रेड वाईनचे तोटे ऐकले आहेत? चला आज फायदे घेऊयात जाणून!
PM

अल्कोहोल किंवा मद्यपान का करू नये याबद्दल आपल्याला कायमच सांगितले जाते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो आणि कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती उत्तमच! काही ड्रिंक्स पिण्याचा सल्ला डॉक्टर स्वतः देखील देतात. अर्थातच ही ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली असतात म्हणून ती प्यायचा सल्ला दिला जातो. रेड वाईनमुळे होणाऱ्या फायद्यांवर अनेकांनी संशोधनं केले आहे . या वाईनचे फायदे सांगणारेही अनेक आहेत आणि तोटे सांगणारेही अनेक. तोटे तर सगळेच ऐकून घेतात पण आज फायदे जाणून घ्या सविस्तर

रेड वाईनचे फायदे-

1. रेड वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. यामध्ये अनेक ॲक्टीव्ह अँटीऑक्सीडंट पण असतात. जे तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतात.

2. रेड वाईनही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. जी चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. ज्यामुले तुमचं हृदय राहत निरोगी आणि वजनही संतुलित राहतं.

3. अँटीऑक्सीडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करते आणि फ्री रॅडीकलपासूनही रक्षण करते. यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत दिसते.

4. रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

5. ॲरिझोना युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार मधमाश्यांना रेड वाईनमधील रेजवेराट्रॉल नामक तत्वाचं सेवन करवण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मधमाश्यांचं आयुष्य वाढलेलं आढळलं. म्हणजे दीर्घाआयुष्यासाठीही रेड वाईन उपयुक्त आहे.

6. नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

7. रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो.

8. व्हर्जीनिया युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा एक ग्लास रेड वाईन प्यायलास कॅन्सरचा धोकाही कमी होतो. रेड वाईन कॅन्सरच्या कोशिकांच्या वाढीची शक्यता कमी करते.

9. रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो.

10. डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.

11. रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांच्या दातातही कॅव्हिटीची समस्या आढळत नाही.

12. रेड वाईनमुळे हिरड्यांची सूजही कमी होते. दातांमधील बॅक्टेरियाही रेड वाईनमुळे नष्ट होतात आणि दात पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होतात.

13.अल्कोहॉलच्या सेवनाने गर्भधारणेच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो असं म्हणतात. पण रेड वाईन याला अपवाद आहे. रेड वाईनमुळे महिलांमध्ये गर्भधारणेची क्षमता वाढते आणि पीरियड्ससंबंधी समस्याही दूर होतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in