थंडीच्या दिवसांत रात्री झोपण्याआधी करा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या सविस्तर

थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना कोरड्या त्वचेचा त्रास सहन करावा लागतो. कोरडेपणामुळे त्वचेवर काळसरपणा येण्यासह पांढरे पॅच दिसू लागतात.
थंडीच्या दिवसांत रात्री झोपण्याआधी करा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या सविस्तर

थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना कोरड्या त्वचेचा त्रास सहन करावा लागतो. कोरडेपणामुळे त्वचेवर काळसरपणा येण्यासह पांढरे पॅच दिसू लागतात. अशावेळी दिवसभर मॉइश्चरायझर लावूनही काही परिणाम दिसत नाही. यात केसांसंबंधित समस्यादेखील वाढताना दिसतात. जसे की केसांचा कोरडेपणा, केस गळती. अशा परिस्थितीत त्वचा आणि केसांची खास काळजी घेणे फार गरजेचे असते. विशेषत: रात्रीच्या वेळी तुम्ही त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी फॉलो केल्यास काही दिवसांतच त्वचा मुलायम, चमकदार होण्यास व केस घनदाट होण्यास मदत होऊ शकते.

बेडरुममधील वातावरण नीट ठेवा-

जसजसे थंड हवामान सुरू होते, तसतसे घरातील हवा कोरडी होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या बेडरुममधील हवेत आवश्यक आर्द्रता टिकवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करा. याच्या वापराने तुमची त्वचा आणि केस कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करता येते. यामुळे एकंदरीत निरोगी आरोग्य ठेवता येते.

चेहरा व्यवस्थित धुवा-

रात्रीच्या स्कीनकेअर रुटीनचा भाग म्हणून सॉफ्ट, हायड्रेटिंग क्लीन्सर किंवा क्लीनिंग लोशनचा वापर करा. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी न करता चेहऱ्यावरील मेकअप आणि अशुद्ध घटक प्रभावीपणे काढू शकता. विशेषत: हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा त्वचा अधिक संवेदनशील असते आणि कोरडेपणाचा धोका असतो, तेव्हा ती अगदी सॉफ्ट पद्धतीने स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

रात्रीच्या वेळी स्कीनकेअर रुटीन फॉलो करा-

त्वचा हायड्रेटिंग ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी हायलूरोनिक ॲसिड आणि सिरॅमाइड्स घटक असणाऱ्या स्कीन केअर प्रोडक्टचा वापर करा, यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासह मदत होते. तसेच जास्त काळ त्वचेतील हायड्रेशन टिकून राहते. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी तुम्ही शिया बटर आणि ओटमील असलेले स्कीन केअर प्रोडक्ट वापरू शकता. रात्रीच्या योग्य स्कीन केअर रुटीन फॉलो केल्यास संपूर्ण हिवाळ्यात त्वचेचे निरोगी आरोग्य राखू शकता.

त्वचेला मॉश्चराइझ करण्यास विसरू नका-

अंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी ओलसर त्वचेवर बॉडीलोशन लावायला विसरू नका. फक्त चेहराच नाही तर इतर त्वचेचीसुद्धा योग्य काळजी घ्या. कोपर आणि गुडघे यांसारख्या जास्त कोरडेपणा जाणवणाऱ्या भागात लोशनचा वापर करा. यासाठी तुम्ही रिच हँड क्रीमचा वापर करू शकता. तसेच रात्रभर कॉटनचे हातमोजे आणि पायमोजे वापरा, विशेषतः हिवाळ्यात जाणवणारा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.

केसांना कंडिशनिंग करा-

रात्री झोपण्यापूर्वी लिव्ह-इन कंडिशनरच्या मदतीने केसांचे कंडिशनिंग करा. झोपण्यापूर्वी तुम्ही असे केल्यास केसांना योग्य पोषण मिळते, शिवाय ते तुटण्यापासून रोखता येतात. तसेच केस मुलायम आणि घनदाट होतात. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकदा केस खूप कोरडे आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कंडिशनिंग ट्रीटमेंट हा एक चांगला पर्याय असू शकतो.

कोमट पाण्याने अंघोळ करा-

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताना बरे वाटते, परंतु यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि होणारी जळजळ रोखण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करा. यातून आपली त्वचा हायड्रेटेड राहील याची खात्री करा.

लिप बाम वापरा-

झोपण्याआधी ओठांना हायड्रेटिंग लिप बाम लावा. स्कीनकेअर रुटीनदरम्यान ओठांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, यामुळे ओठ कोरडे होण्यासह भेगा पडल्याने त्यातून काही वेळा रक्त येऊ लागते. विशेषतः हिवाळ्यात लिप बामचा वापर करून तुम्ही ओठ मऊ आणि गुळगुळीत ठेऊ शकता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in