Immune System: रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम ठेवायची आहे? आवर्जून खा हे ४ पदार्थ

Health Care: ऋतू बदलत असताना रोगप्रतिकारशक्‍ती मजबूत असते महत्त्वाचे ठरते. रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम ठेवण्यास मदत करणारे आरोग्‍यदायी खाद्यपदार्थ कोणते ते जाणून घ्या.
immune-boosting foods
Foods to keep your immune system upFreepik

Immunity Booster: ऋतू बदलत असताना रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ राखण्‍यासोबत तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी आरोग्‍यदायी, संतुलित आहाराचे सेवन करण्‍यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन आहारामध्‍ये बदाम, हंगामी फळे व भाज्‍या यांसारख्‍या आरोग्‍यदायी खाद्यपदार्थांचा समावेश केल्‍यास आजारांविरोधात लढण्‍यास मदत करणारी रोगप्रतिकाशक्‍ती अधिक उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते. खाली चार आरोग्‍यदायी खाद्यपदार्थ देण्‍यात आले आहेत, जे रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राहण्‍यास आणि हंगामी फ्लू व इतर आजारांवर प्रतिबंध ठेवण्‍यास मदत करू शकतात. न्‍यूट्रिशन व वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी यांच्‍याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात.

बदाम

बदाम स्‍वादिष्‍ट असण्‍यासोबत त्‍यांच्‍यामध्‍ये व्हिटॅमिन ई, झिंक, फोलेट व लोह अशी सर्वोत्तम पौष्टिक घटक असतात, जे रोगप्रतिकाशक्‍तीसाठी महत्त्वाचे असतात. उत्तम पोषणासाठी दररोज मूठभर बदामांचे सेवन करा किंवा रोजच्‍या ब्रेकफास्‍टमध्‍ये बदामांचा समावेश करा.

हे ही वाचा

immune-boosting foods
World Bicycle Day 2024: रोज सकाळी फक्त ३० मिनिटे चालवा सायकल, WHO ने सांगितले जबरदस्त फायदे

लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू, मौसंबी व द्राक्षे यांसारख्‍या लिंबूवर्गीय फळांमध्‍ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे पौष्टिक घटक शरीराचे संसर्गांपासून संरक्षण करणाऱ्या रक्‍तातील पांढऱ्या पेशींच्‍या निर्मितीसाठी आवश्‍यक असते. आहारामध्‍ये या फळांचा समावेश केल्‍याने व्हिटॅमिन सी मिळू शकते, परिणामत: रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ होते.

हे ही वाचा

immune-boosting foods
World Multiple Sclerosis Day 2024: मल्टीपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं

लसूण

लसणाचा औषधी उपयोगाचा दीर्घकालीन इतिहास आहे. लसणामध्‍ये अ‍ॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल गुण असण्‍यासोबत नैसर्गिक संयुग अ‍ॅलिसिन असते. आहारामध्‍ये लसणाचा समावेश केल्‍याने स्‍वादाची भर होते, तसेच सूक्ष्‍म जीवाणूंविरोधात लढण्‍यास मदत देखील होते. स्‍वाद व उत्तम आरोग्‍यासाठी रस्‍सा, सूप, स्टिर-फ्राईज व सॉसेसमध्‍ये किसलेले लसूण टाका.

हे ही वाचा

immune-boosting foods
Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे प्रकार, निदान आणि औषधोपचाराचे महत्व जाणून घ्या

हिरव्‍या पालेभाज्‍या

मेथी, शेवग्‍याची पाने, राजगिरा पाने, पुदीना यांसारख्‍या हिरव्‍या पालेभाज्‍यांमध्‍ये व्हिटॅमिन्‍स व अ‍ॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या हिरव्‍या पालेभाज्‍यांमध्‍ये व्हिटॅमिन्‍स ए व सी आणि फोलेट अशी पौष्टिक घटक असतात, जे रोगप्रतिकारशक्‍ती आरोग्‍यदायी राखण्‍यात महत्त्‍वाची भूमिका बजावतात. करी, रस्‍सा, डाळ, सलाड्स अशा स्‍वरूपात हिरव्‍या पालेभाज्‍यांचा आहारात समावेश करा आणि आहाराला पौष्टिक व स्‍वादिष्‍ट करा.

logo
marathi.freepressjournal.in