डार्क चॉकलेटचे खाल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून मिळतो आराम; जाणून घ्या सविस्तर

त्वचेसाठी आणि हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट अतिशय लाभदायी आहे.
डार्क चॉकलेटचे खाल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून मिळतो आराम; जाणून घ्या सविस्तर
PM

लहानांपासून ते मोठयापर्यंत सर्वांनाच डार्क चॉकलेट खायला आवडते. चॉकलेटमध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. परंतु, त्यातल्या त्यात डार्क चॉकलेट हा प्रकार सर्वांचा आवडता चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

त्वचेसाठी आणि हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट अतिशय लाभदायी आहे. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, मासिक पाळीमध्ये महिलांना होणाऱ्या पिरिअड क्रॅम्पसपासून आराम मिळवण्यासाठी देखील डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, डार्क चॉकलेट खाल्ल्याने महिलांचा मूड चांगला राहतो आणि त्यांना आनंद मिळतो. डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवनॉल्स महिलांचा मूड सुधारण्यास आणि त्यांना पिरिअड क्रॅम्प्सपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे, मासिक पाळीमध्ये महिलांनी डार्क चॉकलेटचे सेवन करणे फायद्याचे आहे. आज आपण डार्क चॉकलेटचे इतर फायदे कोणते आहेत? ते जाणून घ्या सविस्तर

मेंदूसाठी लाभदायी

डार्क चॉकलेटमध्ये आढळून येणारे फ्लेवेनॉल्स आपल्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यानंतर मेंदूच्या पेशी निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय, स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून बचाव करण्यास डार्क चॉकलेट मदत करते.

पोषकघटकांनी परिपूर्ण

डार्क चॉकलेटमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. या पोषकघटकांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश आढळून येतो. पोषकघटकांनी परिपूर्ण असलेले हे डार्क चॉकलेट मेंदू तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. त्यामुळे, पोषकघटकांनी परिपूर्ण असलेले डार्क चॉकलेटचे सेवन करणे फायद्याचे आहे.

मूड चांगला राहतो

डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने आपला मूड चांगला राहतो. काही कारणांमुळे मूड बिघडला असेल तर डार्क चॉकलेटचे सेवन केल्यानंतर मूड सुधारण्यास मदत होते. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यानंतर आपला मेंदू एंडोर्फिन नावाचे हार्मोन सोडतो. या हार्मोनमुळे आपला मूड चांगला राहतो आणि आपल्याला बरे वाटते.

तणाव कमी होतो

डार्क चॉकलेटमध्ये आढळून येणाऱ्या घटकांमुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स नियंत्रित केले जातात. ज्यामुळे, आपला तणाव कमी होतो. या व्यतिरिक्त डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे कॅफेन हे आपल्या आरोग्यासाठी आणि तणावापासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in