Happy Hug Day 2024 :‘जादू की झप्पी’ देण्याचे फायदे घ्या जाणून!

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीतरी खास दिवस असतो.
Happy Hug Day 2024 :‘जादू की झप्पी’ देण्याचे फायदे घ्या जाणून!
PM

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीतरी खास दिवस असतो. असाच साजरा केला जाणारा एक दिवस म्हणजे हग डे. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जातो. हग डे ला खूप महत्त्व आहे आणि तो खूप खास मानला जातो.

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे दुसरे सुख नाही, असे बोलले जाते. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस खासच आहे. 'हग डे'च्या निमित्ताने मिठी मारण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.

यासाठी जोडीदाराला रोज मिठी मारावी-

जोडीदाराला रोज मिठी मारल्याने तणाव कमी होण्याबरोबरच चिंता देखील कमी होते. जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने शरीरात 'हे' बदल दिसून येतात.

तणावाची पातळी कमी करते-

तुमच्या जोडीदाराला मिठी मारणे तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुमचा तणाव कमी झाल्याने तुमचा मूडही छान राहतो.

रक्तदाब कमी होतो-

तुम्हाला माहित नसेल पण, 10 मिनिटे हात धरण्यापासून ते 20 सेकंद मिठी मारण्यापर्यंत तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच मिठी हे रोमँटिक तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते.

शरीरातील वेदना कमी होतात -

जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे वेदना कमी होतात.

भीती कमी होते -

एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीतीही खूप कमी होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in