ग्लोइंग स्किनसाठी बनवा घरच्या घरी एलोवेरापासून 'हे' फेसपॅक; जाणून घ्या सविस्तर

एलोवेरामध्ये एन्टीबॅक्टेरियल सारखे अनेक चांगले गुणधर्म असतात. तसेच, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी एलोवेरा गुणकारी आहे.
ग्लोइंग स्किनसाठी बनवा घरच्या घरी एलोवेरापासून 'हे' फेसपॅक; जाणून घ्या सविस्तर
PM

जर तुम्हाला पण तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर तुम्ही त्वचेसाठी एलोवेराचा वापर करू शकता. एलोवेरामध्ये एन्टीबॅक्टेरियल सारखे अनेक चांगले गुणधर्म असतात. तसेच, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी एलोवेरा गुणकारी आहे. एलोवेरा व्यतिरिक्त तुम्ही त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी, सनबर्न पासून सुटका मिळण्यासाठी, चेहऱ्यावर द्सणारी एजिंग दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील मुरुमांशी लढण्यासाठी फारच फायदेशीर आहे. एलोवेराचे कसे वेगवेगळे फेस पॅक तुम्ही घरी कसे अगदी सहजपणे बनवू शकता हे जाणून घ्या.

एलोवेरा आणि मसूरच्या डाळीचा फेसपॅक

या फेसपॅकला बनविण्यासाठी तुम्ही एका वाटीत बारीक केलेली मसूर डाळ घ्या. त्यात टोमॅटोचा रस आणि ताज्या एलोवेराचा बारीक केलेला किस टाकून हे मिश्रण एकत्रित करा. या फेसपॅकला तुम्ही चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा. आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर जमा होणारी धूळ स्वच्छ करण्यासाठी हा फेसपॅक तुमच्या उपयोगी आहे.

एलोवेरा आणि गुलाबजलचा फेसपॅक

या फेसपॅकने तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग दूर होण्यास मदत होईल. हा फेसपॅक बनविण्यासाठी एका वाटीत एलोवेराचा किस किंवा एलोवेरा जेलचा वापर करा. यामध्ये गुलाबजल घालून मिश्रण तयार करा. आणि 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

एलोवेरा आणि मुलतानी मातीचा फेसपॅक

हा फेसपॅकसुद्धा तुमच्या चेहऱ्यासाठी बहुपयोगी आहे. विशेषत: ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हा फेसपॅक उत्तम आहे. एक चमचा मुलतानी माती, एलोवेरा जेल आणि गुलाबजल किंवा थंड दूध घालून तुम्ही हा फेसपॅक तयार करू शकता. चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि चेहरा स्वच्छ धुवा.

एलोवेरा आणि हळदीचा फेसपॅक

एक चमचा एलोवेरा जेलमध्ये तेवढ्याच प्रमाणात हळद घालून मिक्स करा. याला तुम्ही पाणी किंवा गुलाबजलच्या मदतीने मिक्स करू शकता. ही पेस्ट तयार झाल्यानंतर ती 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. हा फेसपॅक चेहऱ्याव लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो तर येईलच पण त्याचबरोबर इतर समस्याही दूर होण्यास मदत होईल.

एलोवेरा जेल आणि केळ्याचा फेसपॅक

यासाठी तुम्ही अर्ध केळं घेऊन त्यात एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. ही पेस्ट 10 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यास या फेसपॅकचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in